हातोडा येथे सूर्य कन्या तापी माता जन्म उत्सव साजरा..

तापी माता पात्रात साडी चोळीचा आहेर अर्पण करून पूजन..
तळोदा शहारा पासून जवळच असलेल्या गुजरात राज्यातील हातोडा येथील श्री तापेश्वर महादेव मंदिर परिसरात सूर्य कन्या तापी माता जन्मोत्सव मोठया भक्ती भावाने साजरा करण्यात आला. सुनिल पाडवी व सौ रंजना पाडवी यांनी सपत्नीक तापी मातेची पुजन करून साडीचोळी अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी माता देवा बाई तसेच सौ भारती रंजीत पाडवी व इतर महिला व ग्रामसथ मोठया प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सुनिल पाडवी, दिपेश पाडवी, रंजीत पाडवी व रवि पाडवी व ग्रामस्थांच्या सहकार्य लाभले.
संयोजक विठोबा महाले गुरूजी यांनी तापी माता महात्म्य विशद केले. आरती नंतर प्रसाद वाटप करणयात आले.
- 0
- 1
- 0
- 0





