खान्देश जळगाव नंदुरबार

लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहाद्याचे प्रसिद्ध भागवतकार ह भ प खगेन्द्र महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन

लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहाद्याचे प्रसिद्ध भागवतकार ह भ प खगेन्द्र महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन 

शहादा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- 

लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस 30 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या वाढदिवसानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह , संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तसेच संगीत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळा मार्गदर्शक म्हणून ह भ प महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज उपस्थित राहणार असून श्री संत मुक्ताई चरित्र कथाकार म्हणून ह भ प विशाल महाराज श्रीक्षेत्र मुक्ताईनगर हे मार्गदर्शन करणार आहेत. संगीत भागवत कथा शहादा येथील भागवत कथाकार ह भ प खगेंद्र महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून होणार आहे.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती उपस्थित राहणार असून दैनंदिन कार्यक्रम यात सकाळी चार ते सहा काकड आरती साडे सहा ते सात या वेळात विष्णुसहस्रनाम सकाळी सात ते दहा या वेळात मुक्ताई चरित्र सकाळी दहा ते अकरा या वेळेत प्रवचन तर भागवत कथा दुपारी दोन ते पाच या वेळेत होणार असून हरिपाठ सायंकाळी पाच ते सहा व किर्तन रात्री आठ ते दहा या वेळेत होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

­­

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *