मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल यांची कोपर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी!

नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भाप्रसे) यांनी दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी कोपर्ली (ता. जि. नंदुरबार) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट (आकस्मिक भेट) दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य केंद्राकडून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांची पाहणी करुन आढावा घेतला.

यात प्रामुख्याने आयुष्यमान भारत कार्ड वाटप, बालक, मातांचे लसीकरण, सिकलसेल तपासणी, प्रसूती सेवा आणि गंभीर रुग्णांसाठी दिली जाणारी संदर्भ सेवा (रेफरल सर्व्हिसेस) यांसारख्या महत्त्वपूर्ण कामांची व नोंदींची पाहणी करून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

इमारत व निवासस्थान बांधकामाची पाहणी आरोग्य सेवेच्या आढाव्यानंतर, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थानांच्या सुरू असलेल्या बांधकामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. कामाचा दर्जा आणि गती याबाबत त्यांनी आढावा घेत, वेळेत व गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्याबाबत संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन व सूचना दिल्या.
- 0
- 0
- 0
- 0





