नंदुरबार

घोटाणे गावात हर घर तिरंगा अभियान

घोटाणे गावात हर घर तिरंगा अभियान

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यात अभियानाच्या माध्यमातून मनामनात राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी संसदरत्न माजी खासदार डॉ.हिना गावित आणि भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत घोटाणे गावात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या भव्य तिरंगा रॅलीमध्ये भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील, भाजपा नगरसेविका रेखा चौधरी, शोभा चौधरी, नीता मराठे, नगरसेवक पंकज चौधरी, भाजपा नेते अविनाश माळी, सरपंच सचिन धनगर, माजी जि. प. सदस्य सागर तांबोळी, रवींद्र गोसावी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *