नंदुरबार

शहादा विविध वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शहादा विविध वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शहादा येथील कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुल, शहादा अंतर्गत वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव, प्रमुख अतिथी म्हणून सोनाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षाताई जाधव, वसंतराव नाईक शैक्षणिक संकुल प्रमुख प्रा. डॉ. हिमांशू जाधव होते. तसेच प्रमुख मान्यवर म्हणून वसंतराव नाईक महाविद्यालय प्राचार्य डॉ डी. डी .राठोड व कला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही. एस. पाटील यांच्यासह , विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. एम. पाटील , उपमुख्याध्यापक एस. आर. बोरसे, प्रवेक्षक ए. डी. खेडकर , खान ए ए उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एम. आर. निकम व के. के. अलकरी यांनी केले. विविध वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांतील व्यक्तिरेखांच्या आकर्षक वेशभूषा सादर केल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविधांगी वेशभूषांमुळे संपूर्ण वातावरण रंगतदार झाले. विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी ठरला. तसेच कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एस पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रेरणात्मक विचार मांडले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. एम.पाटील यांनी सर्व सहभागी विद्यार्थीचे कौतुक केले. नियोजनबद्ध आयोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे विविध वेशभूषा स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *