नेमसुशिल शैक्षणिक समूहात ध्वजारोहण उत्साहात

तळोदा – शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात मोती बँक व अरिहंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षिलभाई तुरखिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेली संस्थेचे निखिलभाई तुरखीया सोनाभाभी तुरखीया इंजि.वतनकुमार मगरे साहेब संजय पटेल सह शहरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत प्रात्यक्षिक, ओळख भारतातील घटकराज्याची व देशभक्तीपर नृत्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्या. श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी प्रिन्सिपल पी डी शिंपी उप प्राचार्या सौ. कल्याणी वडाळकर मुख्या.श्रीमती भावना डोंगरे मुख्या.गणेश बेलेकर विद्यामंदिरातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अरुण कुवर यांनी केले.
- 0
- 0
- 0
- 0





