अमरावती नौकरी संदर्भ

अमरावती ग्रामीण पोलीस भरती ११ ते २६ फेब्रुवारी; २१४ पदांसाठी २१,२०६ अर्ज

अमरावती ग्रामीण पोलीस भरती ११ ते २६ फेब्रुवारी; २१४ पदांसाठी २१,२०६ अर्ज

अमरावती|सप्त नगरी न्यूज ब्युरो

अमरावती ग्रामिण पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाची भरती प्रक्रिया ११ ते २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे.

        अमरावती ग्रामिण पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाची भरती प्रक्रिया ११ ते २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत एकूण पंदापैकी १) सर्वसाधारण-६९, २) महिला ६४, ३) खेळाडू -१०,४) प्रकल्पगस्त – १०, ५) भुकंपगस्त ०४, ६) माजी सैनिक ३१, ७) अंशकालीनपदविधर – १०,८) पोलीस पाल्य ०६, ९) गृहरक्षक – १० प्रमाणे प्रवर्गनिहाय २१४ पदांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून २१२०६ अर्जप्राप्तझाले आहेत. त्यामध्ये पुरुष उमेदवार १६, २८६ व महिला उमेदवार ४,९२० यांचा समावेश आहे.

११ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पुरुषतर २४ ते २६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान महिला उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व शाररिक चाचणी घेण्यात येणार आहे. १५,१९,२२ फेब्रुवारी २०२६ रोजी शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नाही.

ही भरती प्रक्रिया जोग स्टेडियम, पोलीस आयुक्त कार्यालयाचे मागे, मालटेकडी जवळ, अमरावती येथे आयोजीत करण्यात आली आहे. सुरूवातीला दररोज अंदाजे ८०० तर शेवटी २००० उमेदवारांना भरती प्रक्रियेतील शाररीक चाचणी करीता बोलावण्यात आले आहे. भरती करिता बाहेर गावावरुन येणा-या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था वसंत हॉल,मालटेकडी जवळ, अमरावती येथे निशुल्क करण्यात आलेली आहे.

उमेदवारांनी भरतीकरिता त्यांना नेमुण दिलेल्या दिनांकास सकाळी ०५/०० वा. भरतीस्थळी पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांचे कार्यालयाला लागुन असलेल्या व मंथन हॉल (जोग स्टेडीयम) कडे जाणा-या मार्गाने त्यांची सर्व शैक्षणिक कागदपत्रे, ज्या प्रवर्गात अर्ज केला असेल त्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र, भरतीचे ओळखपत्र, पासपोर्ट फोटो ईत्यादी तसेच सर्व मुळ कागदपत्रांची छायाकींत प्रत सह न चुकता हजर राहणे बंधनकारक आहे. भरतीस्थळी उमेदवाराला कुठल्याही मौल्यवान वस्तु व ईलेक्ट्रानिक्स वस्तु जसे मोबाईल, कॅमेराई. नेणे प्रतिबंधीत आहे. उमेदवाराला भरतीस्थळी एकदा प्रवेश मिळाल्यानंतर कुठल्याही कारणास्तव भरतीस्थळावरुन बाहेर जाता येणार नाही.

भरतीस्थळ जोग स्टेडियम, अमरावती हे बस स्थानक, अमरावती येथून अंदाजे १ कि.मी. तसेच रेल्वे स्थानक येथून १.५ कि.मी. असून तेथून उमेदवारांना भरतीस्थळी येण्याकरिता स्थानिक ऑटो रिक्षा किवा इतर प्रवाशी वाहतुक वाहनांनी येणे सोयीस्कर आहे. जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैश्यांची किवा तत्सम अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधीत उमेदवाराने त्याबाबतची माहीती त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांचे दुरध्वनी क्र. ०७२१-२५५३०५५ वर तसेच पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण यांना त्वरीत संर्पक साधुन तक्रार करावी. तसेच या संदर्भात किवा भरती संदर्भाने काही अडचण असल्यास पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण या कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांशी किवा अध्यक्ष, पोलीस भरती समिती २०२५ २६ तथा पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण यांच्याशी हेल्पलाईनक्रं. ७०३०००६८१९ वर संर्पक साधावा

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *