नंदुरबार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवसनिमित्त ४० हजार विद्यार्थ्यांना पावभाजी पार्टी; विद्यार्थ्यांची धम्माल मस्ती अन् जल्लोष; आ. चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा उपक्रम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवसनिमित्त ४० हजार विद्यार्थ्यांना पावभाजी पार्टी

विद्यार्थ्यांची धम्माल मस्ती अन् जल्लोष; आ. चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा उपक्रम

नंदुरबार|सप्त नागरी न्यूज ब्युरो

नंदुरबार पालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भव्य ‘पावभाजी पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. २ दिवसात ४० हजार पार्टीत सहभागी होणार असून काल पहिल्या दिवशी २० ते २२ हजार विद्यार्थ्यांना पावभाजी देण्यात आली.

                 या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पावभाजी पार्टीच्या आनंद लुटत विद्यार्थ्यांनी शाळेत जल्लोष साजरा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस केवळ राजकीय सोहळा म्हणून साजरा न करता, तो सामाजिक बांधिलकीतून आणि विद्यार्थ्यांच्या आनंदात साजरा व्हावा, या संकल्पनेतून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी या मेजवानीचे नियोजन केले होते.

               शहरातील मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या विविध शाळांमध्ये जाऊन आ. चंद्रकांत रघुवंशी मंडळ तर्फे विद्यार्थ्यांसाठी ही मेजवानी उपलब्ध करून दिली. यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, “विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त या भावी पिढीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.” याप्रसंगी बांधकाम सभापती देवेंद्र जैन,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शिक्षण समिती सभापती भावना,महिला बालकल्याण सभापती शितल वसावे यांच्यासह नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.चंद्रकांत रघुवंशींनी साधला संवाद

सकाळचा सत्रात शाळेचा मधल्या सुट्टीत पावभाजी पार्टीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली.
अनेक शाळांमध्ये नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, मेघा रघुवंशी यांनी भेट देऊन स्वतः विद्यार्थ्यांना पावभाजीचे वितरण केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. नगराध्यक्षांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह विविध कला, क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

  • 1
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *