बीडच्या केज तालुक्यातील माळेगावात शिवजयंतीनिमित्त रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार
बीड|सप्त नगरी न्यूज ब्युरो
केज तालुक्यातील माळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत शिवतीर्थ केसरी २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
केज तालुक्यातील माळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यत शिवतीर्थ केसरी २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी गावातील मैदानावर बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार असून विजेत्यास स्कूटर बक्षीस मिळणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या संयोजनातून व माळेगाव येथील शिवतीर्थ केसरी मित्र मंडळ यांच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा एक आदत, एक बैल आणि ओपन या अशा तीन गटात घेण्यात येणार असून भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमांनुसार शर्यत पार पडणार आहे. परिसरासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील नामांकित गाडा मालक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून शर्यतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम येणाऱ्यास स्कूटर बक्षीस, दुसऱ्या स्पर्धकास ३१ हजार रुपये, तिसऱ्या २१ हजार रुपये, चौथ्या स्पर्धकास १५ हजार रुपये, पाचव्या स्पर्धकास ११ हजार रुपये, सहाव्या स्पर्धकास नऊ हजार रुपये, सातव्या स्पर्धकास सात हजार रुपये व आठव्या स्पर्धकास सहा हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत.
या शर्यतीचे समालोचन कृष्णा (भेट्या) शुक्ला हे करणार असून पंच म्हणून अशोक करंडे आणि नंबर टेकर म्हणून विजय कदम, किशोर कदम, नामदेव गव्हाणे, तुकाराम दोडके, समाधान लोकरे, अशोक गव्हाणे हे काम पाहणार आहेत. बैलगाडा शर्यत प्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- 0
- 0
- 0
- 0