रोबोटच्या सहाय्याने विमानतळाचे हस्तांतरण नागपूर, दि. २५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिकीकरण आणि विस्तारासाठी जीएमआर समूहाकडे सोपविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू तसेच जीएमआर कंपनीचे जी.बी.एस. राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा आज अत्यंत आधुनिक पद्धतीने पार पडला. विमानतळाच्या गेटवर […]
नागपूर
महाराणा प्रतापसिंह यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
महाराणा प्रतापसिंह यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन नागपूर, दि.१७ : महान योद्धा मेवाडचे क्रांतीसूर्य राजे महाराणा प्रतापसिंह तथा प्रतापसिंह पहिले यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण […]
नागपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्याप्रस्तावास प्रशासकीय मान्यता
नागपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्याप्रस्तावास प्रशासकीय मान्यता नागपूर, दि. 3 : आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे योजनेअंतर्गत नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 4 कोटी किमतीच्या प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमीत केला आहे. यानुसार आधुनिक […]
देशातील पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना साकार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशातील पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना साकार –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खाजगी गुंतवणुकीतून पहिला प्रकल्प तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया 28 टन गॅसची निर्मिती नागपूर, दि. 30: देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खाजगी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात […]
सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे, दि. १७ : पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असून सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून निर्माण झालेले हे केंद्र आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुणे […]
वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-२०२६’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-२०२६’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नागपूर, दि. ४ – वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. केवळ ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आम्ही महान होणार नाही, तर यासह वर्तमान आणि भविष्याची वैश्विक […]
सुजलाम- सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड
सुजलाम- सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 31 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन विश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड नागपूर, दि.26 : सावनेरच्या मुख्य रस्त्याचे सौंदर्यीकरण व मौनीबाबा आश्रमाचे भूमिपूजन आज झाले. खत आणि कोल गॅसिफिकेशन असे दोन मोठे प्रकल्प या भागात उभे राहणार आहेत यातून 40 […]
गरजेपेक्षा अधिक पेट्रोल व डिझेल खरेदी करू नका– जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर पॅनिक न होण्याचेही नागरिकांना आवाहन
गरजेपेक्षा अधिक पेट्रोल व डिझेल खरेदी करू नका– जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर पॅनिक न होण्याचेही नागरिकांना आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा नागपूर, दि. २५ – अधिक सुरक्षितता आणि अनावश्यक काळजी या दोन गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून ग्राहक भीतीपोटी आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करीत आहेत. एरव्ही ज्यांना जेवढी गरज आहे तेवढेच इंधन घेण्याचा ग्राहकाचा कल […]
पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्गजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारजागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न
पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्गजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारजागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न धाराशिव,दि.२३ मार्च (जिमाका)जिल्ह्यात जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून “जिथे पाणी वाढते,तेथे समृद्धी वाढते” याच्या अनुषंगाने व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे.पाण्याचे योग्य नियोजन व लोकसभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. […]
आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करा; – आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर
आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करा; – आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर नागपूर ,| सप्त नगरी न्यूज ब्युरो महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री माननीय नामदार प्रकाशजी आबिटकर यांनी आज नागपूर येथे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. प्रशिक्षण संस्थांचा दर्जा […]










