नागपूर

आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करा; – आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर

आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करा; – आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर

नागपूर  ,| सप्त नगरी न्यूज ब्युरो महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री माननीय नामदार प्रकाशजी आबिटकर यांनी आज नागपूर येथे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

प्रशिक्षण संस्थांचा दर्जा उंचावणार

राज्यातील आरोग्य सेवेचा कणा असलेल्या सर्व प्रशिक्षण संस्थांचा दर्जा सुधारण्यावर नामदार आबिटकर यांनी विशेष भर दिला. ते म्हणाले की, “आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे कौशल्य अद्ययावत असणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी राज्यातील सर्व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यात येईल. या संस्थांना आधुनिक संसाधने उपलब्ध करून देऊन त्यांचा दर्जा राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

अधिकारी व कर्मचाऱ्यांना देश-विदेशात प्रशिक्षण
जागतिक दर्जाचे ज्ञान:*
कर्मचाऱ्यांना आधुनिक वैद्यकीय उपचार आणि व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवण्याची कार्यवाही सुरू होणार.
आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जागतिक स्तरावरील उत्तम आरोग्य पद्धतींची माहिती व्हावी, यासाठी त्यांना गरज पडल्यास इतर राज्यांत तसेच देश-विदेशात अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात येईल, असे निर्देश माननीय मंत्र्यांनी दिले. कामाच्या स्वरूपानुसार आणि आवश्यकतेनुसार अशा प्रशिक्षणाचे नियोजन करण्याबाबत त्यांनी प्रशासनाला तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
समन्वय: नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि राज्य स्तरावरील संस्थांमध्ये समन्वय वाढवणार.

प्रशिक्षणार्थींच्या आहाराचा आणि निवासाचा दर्जा सुधारणार

“राज्यातील आरोग्य प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आहाराचा दर्जा (Diet Quality) सुधारण्याबाबत नामदार आबिटकर यांनी विशेष सूचना दिल्या. प्रशिक्षण कालावधीत मिळणारा आहार हा सकस, पौष्टिक आणि दर्जेदार असावा, तसेच मेस (Canteen) मधील स्वच्छतेबाबत कसलीही तडजोड केली जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणार्थींना उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा मिळाल्यास त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक बदल होईल, असेही त्यांनी नमूद केले.”

बैठकीला उपस्थित अधिकारी
या बैठकीला आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने खालील अधिकारी समावेश होता:
डॉ. अजय डवले, संचालक, राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था.नागपूर
डॉ शशिकांत शंभरकर, उपसंचालक. नागपूर
डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी.
डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक.
डॉ. शेलोकर, वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका.
डॉ. योगेंद्र सवाई, प्राध्यापक.

PrakashAbitkar

MahaAarrogya

Nagpur

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *