पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ मुंबई, दि. १७ :- पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून झेंडा दाखवून शुभारंभ केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे उपस्थित होते.पुणे […]
मुंबई उपनगर
मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 16: ग्रामीण भागातील दुग्धजन्य पदार्थ आणि अन्य कृषी उत्पादने मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मुंबई मेट्रो’ हे मोठे आणि प्रभावी माध्यम आहे. यामुळे निश्चितच ग्रामीण भागातील उत्पादनांना मुंबईमध्ये हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो […]
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामीण पेयजल धोरण सादरीकरण बैठक पाणीपुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर युनिटची निर्मिती मुंबई, दि. १२ :- सध्या राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढत आहे. यापुढे मात्र राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना […]
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती नवी मुंबई,दि.6(विमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले.हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या […]
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 3 : मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यानी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. प्रसारभारती समवेत झालेल्या […]
89 हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार, पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
89 हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार, पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई, दि. 26 : महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सुमारे 89 हजार 731 कोटी रुपयांच्या पाच विशाल […]
तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता मुंबई,दि.१८ : राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच भाविक-पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधासह आरोग्यसुविधाची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी […]
आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर विमाधारकांच्या तक्रारींची शासन करणार शहानिशा
आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर · विमाधारकांच्या तक्रारींची शासन करणार शहानिशा मुंबई, दि. ११: आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी व रुग्णालयांची अवाजवी वैद्यकीय बिले याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, खासगी […]
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी
मुंबई/उरण : उरण-नेरूळ आणि बेलापूर मार्गावरील लोकल सेवांचा विस्तार लवकरच होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. नेरूळ-उरण-नेरूळ ४ आणि बेलापूर-उरण-बेलापूर ६ अशा एकूण १० अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. तरघर आणि गव्हाण ही नवी स्टेशन मंजूर झाल्याचेही सांगितले. मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू […]









