रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन रायगड-अलिबाग,दि.15 (जिमाका): उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टी संपवून, मनात नवीन आशा-आकांक्षा आणि हातात नवीन वह्या-पुस्तके घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी उत्साहात शाळेत आपले पहिले पाऊल टाकले. यानिमित्ताने रायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये अनोखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची […]
रायगड
इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत;
इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत; पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी डिजिटल शिक्षणाबाबत दिला प्रेरणादायी संदेश रायगड-अलिबाग,दि.१५(जिमाका) : पनवेल येथील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी संवाद घडला. शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेत […]
महाराजस्व समाधान शिबिरात विविध शासकीय दाखल्यांचे वाटप; मांगरुळ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराजस्व समाधान शिबिरात विविध शासकीय दाखल्यांचे वाटप; मांगरुळ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रायगड –अलिबाग , जिमाका, दि.१४- राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत कामार्ली महसूल मंडळातील मांगरुळ येथे शिबिराचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रविंद्र पाटील,प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार […]
प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल– अपर मुख्य सचिव विकास खारगे
प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल– अपर मुख्य सचिव विकास खारगे रायगड-अलिबाग,दि.7(जिमाका): “लोकशाही व्यवस्थेत नागरिक हा केंद्रबिंदू असून त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि सुखकर करणे, हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यभर राबविला जात असून, याद्वारे प्रशासकीय सेवा थेट […]
आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी–आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके
आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी–आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके रायगड-अलिबाग,दि.7(जिमाका): “आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आणि त्यांचा देदीप्यमान इतिहास हा त्या समाजाचा खरा आत्मा आहे. जल, जमीन आणि जंगल यांचे रक्षण करणाऱ्या या समाजाच्या परंपरांचे जतन करणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन राज्याचे […]
रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी दिला राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय. म्हसळा नगरपंचायतीत सात सदस्य अपात्र.
रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी दिला राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय. म्हसळा नगरपंचायतीत सात सदस्य अपात्र. शिंदे गटाला बसला मोठा धक्का. म्हसळा नगरपंचायतीत पक्षादेशाचे उल्लंघन करत नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश. रायगड|सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील म्हसळा नगरपंचायतीतील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी […]
रायगड दर्शन घेऊन परतताना टेम्पो ट्रॅव्हलर चा ब्रेक फेल झाल्याने पुनाडे घाटात अपघात.
रायगड दर्शन घेऊन परतताना टेम्पो ट्रॅव्हलर चा ब्रेक फेल झाल्याने पुनाडे घाटात अपघात. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात रायगड किल्ल्याचे दर्शन घेऊन परत जाताना अहिल्यानगर येथील शिवभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला रायगड जवळील पुनाडे घाटात अवघड वळणावर अपघात झाला आहे. या टेम्पो ट्रॅव्हलर चा ब्रेक फेल झाल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या १८ प्रवाशांपैकी पाच जण […]
जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ
जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ रायगड | सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि रजोनिवृत्तीच्या (Menopause) काळात उद्भवणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक समस्यांवर योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले हे क्लिनिक जिल्ह्यातील ४० ते […]
कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न.
कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न. रायगड / सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कारागृहातील बंद्यांना (कैद्यांना) कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला. कारागृहातील बंदी सुटून गेल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध […]
निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरूवात, मतदान केंद्राकरीता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके करण्यात आली गठीत. अनुपस्थितांवर कडक कारवाईचे निर्देश.
निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरूवात. मतदान केंद्राकरीता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके करण्यात आली गठीत. अनुपस्थितांवर कडक कारवाईचे निर्देश. रायगड / सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड – रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल महानगरपालिकेची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडावी यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक […]










