रायगड

रायगड दर्शन घेऊन परतताना टेम्पो ट्रॅव्हलर चा ब्रेक फेल झाल्याने पुनाडे घाटात अपघात.

रायगड दर्शन घेऊन परतताना टेम्पो ट्रॅव्हलर चा ब्रेक फेल झाल्याने पुनाडे घाटात अपघात.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात रायगड किल्ल्याचे दर्शन घेऊन परत जाताना अहिल्यानगर येथील शिवभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला रायगड जवळील पुनाडे घाटात अवघड वळणावर अपघात झाला आहे.

या टेम्पो ट्रॅव्हलर चा ब्रेक फेल झाल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या १८ प्रवाशांपैकी पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.

तर तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.अहिल्यानगर येथून MH.१२.MH.६७६३ या क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलर मधून१८ शिवभक्त रायगड किल्ला पाहण्यात आले होते.

रायगड किल्ला पाहून झाल्यानंतर सायंकाळी ते परतीच्या प्रवासात माणगाव मार्गे पुण्याकडे जात असताना रायगड माणगाव रस्त्यावरील पुनाडे घाटात अवघड वळणावर टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने चालकाला गाडीवरचा वेग नियंत्रणात आणणे अशक्य झाल्याने हा टेम्पो उलटा झाला.

बसमधून प्रवास करणाऱरे पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

तसेच तीन शिवभक्तांची अवस्था गंभीर असल्यामुळे १) राहुल नागरे , २) अमोल फडतरे ,३) आसाराम तोगे या ३ शिवभक्तांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलविण्यात आल्याची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मोरे यांनी सांगितले.

इतर शिवभक्तांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किरकोळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेचे वृत्त कळताच किल्ले रायगड हॉटेल व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख तसेच शिराज सय्यद व किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी यांनी टेम्पो ट्रॅव्हलर मधील शिवभक्तांच्या उपचारासाठी तातडीने धाव घेऊन त्यांना मदत केली.

तसेच रात्रीचा अंधार असल्याने व या शिवभक्तांना जेवण व चहा नाष्टा याची मदत करण्याचे काम किल्ले रायगड हॉटेल व्यवसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *