
आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन
आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. या अपघातात पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं. पवार यांच्या बरोबर दोन सुरक्षा रक्षक, आणि दोन वैमानिक होते.
विमान उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार विमानातील एकही जण वाचलेला नाही. व्ही एस आर या कंपनीच्या largejet ४५ विमानाने पवार प्रवास करीत होते. अजित पवार यांच्या विमानात त्यांच्यासह त्यांचे मुंबईचे पीएसओ विदीप जाधव वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट हे होते. मुंबईहून सकाळी आठ वाजून दहा मिनिटानी विमानाने उड्डाण केले आणि बारामती मध्ये आठ वाजून ५० मिनिटांनी उतरले. त्यावेळी विमानाला अपघात झाला. अजित पवार यांच्या पाश्च्यात पत्नी खासदार सुनेत्रा पवार मुलं पार्थ आणि जय पवार असा परिवार आहे.
दरम्यान, राज्यात 3 दिवसांचा शासकीय दूखवटा जाहीर करण्यात आला आसुन, राष्टपती द्रौपदी मुर्मू ,पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेद्र फड़णवीस आदी नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्ल तीव्र दुःख व्यक्त केल आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे २२ जुलै १९५९ मध्ये अजित पवार यांचा जन्म झाला. १९८२ मध्ये अजित पवार यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला. १९९१: पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९९१ मध्ये ते १० व्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. अवघ्या चार महिन्यांत त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. १९९५ साली अजित पवार बारामती मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले.
१९९९ मध्ये बारामती मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले. त्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले. विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात त्यांनी ऑक्टोबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत सिंचन मंत्री म्हणून काम पाहिले. डिसेंबर २००३ ते ऑक्टोबर २००४ पर्यंत पवार यांनी ग्रामीण विकास मंत्री म्हणूनही काम पाहिले. महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्रीपद ४ वेळा भूषविण्याचा बहुमान त्यांना मिळाला. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळं होऊन ते राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले आणि परत एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले.
- 0
- 0
- 0
- 0





