
रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी दिला राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय.
म्हसळा नगरपंचायतीत सात सदस्य अपात्र.
शिंदे गटाला बसला मोठा धक्का.
म्हसळा नगरपंचायतीत पक्षादेशाचे उल्लंघन करत नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश.
रायगड|सप्त नगरी न्युज ब्युरो
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील म्हसळा नगरपंचायतीतील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी दिला आहे.रायगड जिल्हाधिकारी यांनी सात नगरपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या प्रिंसिपल गटनेते श्री. संजय प्रभाकर कर्णिक यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम ३(२) अन्वये दाखल केलेला अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे.या निर्णयामुळे म्हसळा नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणात श्रीम. कमल रविंद्र जाधव, श्रीम. मेहजबिन नदिम दळवी, श्री. असहल असलम कादिरी, श्रीम. फरहीन अ. अझीज बशारद, श्रीम. सुमैया कासम आमदानी, श्रीम. सारा अ. कादीर म्हसलाई व श्री. शाहिद सईद जंजिरकर (सर्व राहणार म्हसळा) यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ तसेच नियम १९८७ मधील तरतुदीनुसार नगरपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित करण्यात आले आहे.
म्हसळा नगरपंचायतीत पक्षादेशाचे उल्लंघन करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सात नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र ठरवले.या निर्णयामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गटाची राजकीय गणिते कोलमडली आहेत.
शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल असून खळबळ माजली आहे.विशेषतः मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटासाठी हा निर्णय मोठा मानहानीकारक पराभव मानला जात आहे.म्हसळा तालुक्यात उभे राहिलेले शिंदे गटाचे बळ एका झटक्यात कमकुवत झाले असून, या निकालाचा थेट परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी एकत्रितपणे पक्षांतर करत शिंदे गटाची वाट धरली होती.या घटनेमुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ आणि राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का बसला होता.मात्र, या पक्षांतराविरोधात सुनील तटकरे यांनी आक्रमक भूमिका घेत कायदेशीर लढाई छेडली.याप्रकरणी अलिबाग येथे सविस्तर सुनावणी पार पडली.सर्व बाजूंचा विचार करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित नगरसेवकांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे म्हसळा नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, राष्ट्रवादी काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत झाली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल राष्ट्रवादीसाठी मोठे राजकीय अस्त्र ठरणार असल्याचे बोलले जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तटकरेंच्या रणनीतीचे जिल्हाभर कौतुक होत आहे.
दुसरीकडे, मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटासाठी हा निर्णय मोठा मानहानिकारक पराभव मानला जात आहे.म्हसळा तालुक्यात उभे राहिलेले शिंदे गटाचे बळ एका झटक्यात कमी झाले असून, आगामी निवडणुकांमध्ये या निकालाचा थेट परिणाम दिसून येणार आहे.एकूणच, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे रायगडच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
- 0
- 0
- 0
- 0





