
एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात मराठी भाषा गौरव दिवस साजरा
तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो
एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलातळोदा येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कवी, साहित्यकार कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक यहे होते. के. जी. विभागातील लहान विद्यार्थ्यांनी मराठी बडबड गीत आपल्या बाल बोबड्या भाषेत गाऊन सर्वांना हसवलं. प्राथमिक च्या विद्यार्थांनी महाराष्ट्रातील लोक कला सादर केल्यात. वासुदेव बनून आलेल्या विद्यार्थ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रामपहारी येणारा वासुदेव आज काळाच्या ओघात हरवला असल्याचे जाणीव मुख्याध्यापक नाईक सरांनी बोलून दाखवली. मराठी भाषा ही अभिजात भाषा असून मराठी भाषेत विपूल साहित्य व साहित्यकार होऊन गेले आहेत. मराठी भाषा ही समृद्ध असून एकाच शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द आहेत, म्हणी व वाक्यप्रचारांमुळे मराठी भाषा ही प्रभावी ठरते असे मुखायध्यापक सत्यजित नाईक यांनी प्रतिक्रिया दिली.
या वेळी हायस्कूल च्या विद्यार्थांनी मराठी व्याकरण व भाषणं सादर केली.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सौ. प्रणया महाजन यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती मनीषा मगरे यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
- 1
- 0
- 0
- 0





