नंदुरबार

नवोपक्रम स्पर्धेत लोय येथील अंगणवाडी सेविका बबिता पाडवी राज्यात द्वितीय

नवोपक्रम स्पर्धेत लोय येथील अंगणवाडी सेविका बबिता पाडवी राज्यात द्वितीय

नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित नवोपक्रम स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील लोय येथील अंगणवाडी सेविका बबिता रोशनराज पाडवी यांनी राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. सलग दोन वर्षे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवत त्यांनी लोय गावासह नंदुरबार जिल्ह्याचा लौकिक वाढवला आहे.
सन २०२५-२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण १०७० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. पूर्व प्राथमिक गटातून बबिता पाडवी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल त्यांचा यथोचित सन्मान संचालक डॉ. हेमंत वसेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, डॉ. इब्राहिम नदाफ, डॉ. दत्तात्रय थिटे आदी मान्यवर उपस्थित होते.अंगणवाडी केंद्र डोंगरपाडा येथे बालकांच्या सहभागातून शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर या नवोपक्रमाची नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी तसेच जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी पाहणी केली होती.
या स्पर्धेसाठी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरीभाऊ हाके, आयसीडीएस प्रकल्प अधिकारी यशोदा पवार, विस्तार अधिकारी विलास धनगर, पर्यवेक्षिका सी. एम. वसावे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबारचे प्राचार्य डॉ. दिपक साबळे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी, प्रदीप पाटील, सुभाष वसावे आदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.यशाबद्दल भावना व्यक्त करताना बबिता पाडवी म्हणाल्या की, “अंगणवाडीतील चिमुकली बालके, गरोदर माता, स्तनदा माता, माझा परिवार व मैत्रिणी यांच्या अथक प्रयत्न व सहकार्यामुळे हे यश शक्य झाले.”

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *