नंदुरबार

गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार राजेश पाडवींवरील निष्ठेचे अनोखे प्रतीक; कार्यकर्त्याने छातीवर कोरला टॅटू

गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार राजेश पाडवींवरील निष्ठेचे अनोखे प्रतीक; कार्यकर्त्याने छातीवर कोरला टॅटू

तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शहरातील पाणीपुरी व्यवसायिक व आमदार राजेश पाडवी यांचे कट्टर समर्थक प्रकाश शर्मा यांनी आपल्या लाडक्या नेत्याविषयीचा आदर, प्रेम आणि निष्ठा व्यक्त करण्यासाठी छातीवर आमदार राजेश पाडवी यांचा टॅटू कोरला आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या राजकीय गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा अनोखा निर्णय घेतला.

प्रकाश शर्मा हे आमदार पाडवी यांच्या कार्याने प्रेरित असून, त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करण्यासाठी त्यांनी कायमस्वरूपी टॅटू काढल्याची चर्चा सध्या तळोदा शहरात रंगली आहे. आपल्या नेत्याबद्दलची निष्ठा अशा अनोख्या पद्धतीने व्यक्त केल्याने अनेकांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

दरम्यान, गुरुपौर्णिमेच्या काळात आमदार राजेश पाडवी हे परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांना या घटनेची प्रत्यक्ष माहिती मिळू शकली नव्हती. मात्र दौरा आटोपून मतदारसंघात परतल्यानंतर त्यांनी प्रकाश शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रेमाची आणि विश्वासाची दखल घेत आभार व्यक्त केले. तसेच कार्यकर्त्यांचे प्रेम हीच आपल्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.


विशेष म्हणजे, तळोदा शहरात यापूर्वीही काही कार्यकर्त्यांनी आपल्या आवडत्या नेत्यांबद्दलची निष्ठा टॅटूच्या माध्यमातून व्यक्त केली होती. आता प्रकाश शर्मा यांनी आमदार राजेश पाडवी यांचा टॅटू छातीवर कोरल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा ठरला असून, गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अनोखा संदेश असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली….

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *