नंदुरबार

हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून २ हजार च्या वर भाविक नांदेड कडे रवाना

हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून २ हजार च्या वर भाविक नांदेड कडे रवाना

जळगाव दिनांक २३, सप्त नगरी न्युज ब्युरो

नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या’ हिंद दि चादर ‘श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या समागम वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अंदाजे अंदाजे २ हजाराच्या वर भाविक नांदेड कडे रवाना झाले आहेत.

                आज जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी एरंडोल येथे भाविकांच्या बसला हिरवा झेंडा दाखवून नांदेड कडे मार्गस्थ केले. तसेच प्रत्येक तालुक्यात उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत भाविकांच्या बस नांदेड कडे रवाना झाल्या.

नांदेड येथे जाणाऱ्या भाविकांमध्ये जामनेर चाळीसगाव,रावेर,पारोळा, जळगाव ,एरंडोल, अमळनेर, पाचोरा, चोपडा,भडगाव,धरणगाव या तालुक्यातून भाविक बस, खाजगी वाहन,रेल्वे द्वारे नांदेड कडे रवाना झाले. काही तालुक्यांमध्ये सेवाभावी संस्थांच्या मदतीने हे भाविक कार्यक्रमासाठी रवाना झाले असल्याची माहिती प्रशासन कडून प्राप्त झाली आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *