
तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो
तळोदा शहर दोडे गुजर महिला समाजाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यापण करण्यात आली.
तळोदा शहर दोडे गुजर महिला समाजाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हळदी-कुंकू समारंभासोबतच महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ संगीत खुर्ची, लिंबू चमचा आणि उखाण्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला त्यात संगीत खुर्ची मध्ये प्रथम क्रमांक सौ.डिंपल चंद्रकांत पाटील व द्वितीय क्रमांक सौ. वैभवी दीपक चव्हाण आणि लिंबू चमचा मध्ये प्रथम सौ.राखी सुनील पाटील, द्वितीय क्रमांक सौ.सोनी विनोद चव्हाण व लहान गटातून प्रथम कु.उर्वशी दीपक चौधरी द्वितीय क्रमांक कु.पलक सनी पाटील आलेल्या व्यक्तींना भेट वस्तू देण्यात आली. तसेच उपस्थित सर्व समाजातील महिलांना तळोदा शहर दोडे गुजर समाजाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला भेट वस्तू देण्यात आली.
एकमेकींना वाण देऊन आणि तिळगूळ वाटून उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
याप्रसंगी सौ.चित्रा राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की, “अशा कार्यक्रमांमुळे समाजातील महिलांना एकत्र येण्याची आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दोडे गुजर समाज नेहमीच पुढाकार घेत असतो.” या सोहळ्याला तळोदा शहरातील दोडे गुजर समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पलक दिपक चौधरी यांनी केले
- 1
- 0
- 0
- 0





