नंदुरबार

मूक बधिर व मतिमंद विद्यालयात भारतीय जैन संघटनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मूक बधिर व मतिमंद विद्यालयात भारतीय जैन संघटनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप चित्रकला स्पर्धेचे आयोजन …

तळोदा / सप्त नगरी ब्युज ब्युरो
तळोदा येथील भारतीय जैन संघटना जिल्हा शाखे तर्फे मनुदेवी फाउंडेशन संचलित मुला मुलींचे निवासी विद्यालयात, काकूमाय बहुउद्देशीय अपंग सेवा संस्था मतिमंद मुलींची शाळा येथे जीवनाआवश्यक वस्तू किराणा व इतर खाद्यपदार्थ वस्तूंचे वाटप करण्यात आले.

                           मूकबधिर व मतिमंद मुला मुलींच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी या हेतूने त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील पहिले पाच स्पर्धक अनुक्रमे पुनम पाडवी, पूजा पाडवी, तेजस गावित, सोहम गावित, पिंकी वळवी यांना एलसीडी पाटी सलेट पारितोषिक म्हणून देण्यात आले.

                                भारतीय जैन संघटनेने मूकबधिर व मतिमंद मुला-मुलींबद्दल दाखविलेल्या या स्नेहभाव व आपुलकीमुळे मुले मुली संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी भारावले भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड.अल्पेश जैन यांनी याप्रसंगी संघटनेच्या उद्देश भूमिका व राबविलेले विविध उपक्रमांचे सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास चेतन शर्मा, कुशल जैन, चेतन धानका, काळूसिंग पाडवी, प्रेम पाडवी, संस्थेचे मुख्याध्यापक विनोद चौधरी विषय शिक्षक अरुण शिंदे, गौरव वसईकर, जागृती मॅडम फुलाबाई, सचिन चौधरी, भास्कर कुवर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कोळी आदीसह इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते .

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *