नंदुरबार

धडगाव येथे पशुपालकांसाठी ‘मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम’ यशस्वी

धडगाव येथे पशुपालकांसाठी ‘मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम’ यशस्वी

धडगाव /सप्त नगरी न्युज ब्युरो

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्राम परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पशुपालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम’ शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सुर्यदर्शन शेतकरी प्रोड्यूसर कंपनी लि., कात्री, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथे उत्साहात पार पडला.

हा कार्यक्रम पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती धडगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी कुलदेवता आई देवमोगरा मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. तुषार गीते, जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. रमेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी, धडगाव यांच्या हस्ते झाले. यावेळी मा. श्री. उदेसिंग पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सुर्यदर्शन शेतकरी प्रोड्यूसर कंपनी लि., मा. डॉ. निलेश जोगदंड, पशुधन विकास अधिकारी (वि.), पं. स. धडगाव, तसेच डॉ. मनोज पावरा, पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.

प्रशिक्षणासाठी प्रमुख वक्ते म्हणून:
कोळदा कृषी विज्ञान केंद्र वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे, नंदुरबार निवृत्त सहाय्यक आयुक्त डॉ. किशोर पाटील, कोळदा कृषी विज्ञान केंद्र  प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. राजेश भमसार, निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेंद्र गुजराथी, यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणात पशुपालनातील मूल्यसाखळी विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पन्नवाढीच्या संधी, बाजारपेठ व्यवस्थापन व उद्योजकता विकास या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता पिन्नलवार, पशुधन विकास अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. आशिष वेदपाठक, डॉ. तन्वी कोयंडे, श्री. राजपाल पावरा, श्री. नरेंद्र चव्हाण, श्री. गुलाबसिंग वळवी, श्री. महेंद्र पावरा व श्री. अक्षय कोकणी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास तालुक्यातील एकूण ७८ पशुपालकांची उपस्थिती होती. प्रशिक्षणात सहभागी पशुपालकांसाठी चहापान, अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे व पुस्तके वितरित करण्यात आली.

kvknandurbar #FPO #AnimalHusbandry #TribalDevelopment

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *