Politics नागपूर

भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी.

भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी.

नागपूर  / सप्त नगरी न्युज ब्युरो

राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.उद्या या अर्जांची छाननी होईल. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल. आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होईल.

भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे. यंदा काही ठिकाणी जुन्या आणि प्रभावी उमेदवारांना तर काही ठिकाणी नव्या युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक एक मधून खुल्या संवर्गातून विकी कुकरेजा, प्रभाग दोन मधून एससी महिला आरक्षण संवर्गातून डॉक्टर सरिता मिलिंद माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून एसटी संवर्गातून माया इवनाते यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 15 धरमपेठ मधून सुनील हिरणवार, तर प्रभाग क्रमांक 26 मधून एससी संवर्गातून धर्मपाल मेश्राम, प्रभाग क्रमांक 28 ओबीसी संवर्गातून विजय झलके, प्रभाग क्रमांक 35 मनीष नगर मधून एससी संवर्गातून संदीप गवई तर प्रभाग क्रमांक 36 एससी संवर्गातून माया हाडे यांना तसंच शिवानी दाणे यांना खुल्या संवर्गातून उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक 37 एसी महिला संवर्गातून निधी तेलगोटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेतर्फे आठ प्रभागांसाठी विविध संवर्गातून उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात युती झाली असून भारतीय जनता पक्षाने 143 उमेदवार उतरविले आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने 8 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उबाटा गट युती झाली असून कॉंग्रेसने देखील 100 च्या वर उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने देखील 100 च्या आसपास उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *