Politics अमरावती महाराष्ट्र राजकारण

आम्हाला एमआयएमच्या पाठिंब्याची गरजच नाही – चंद्रशेखर बावनकुळे

आम्हाला एमआयएमच्या पाठिंब्याची गरजच नाही – चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती |सप्त नगरी न्यूज ब्युरो अमरावती महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी आम्ही एमआयएमला पाठिंबा मागितला नव्हता. एमआयएमच्या नगरसेविका मिरा कांबळे यांनी स्वतःहून पाठिंबा दिला. याबाबत आमच्यापैकी कुणी त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली नव्हती, असे स्पष्ट मत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
                 अमरावती महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी आम्ही एमआयएमला पाठिंबा मागितला नव्हता. एमआयएमच्या नगरसेविका मिरा कांबळे यांनी स्वतःहून पाठिंबा दिला. याबाबत आमच्यापैकी कुणी त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली नव्हती, असे स्पष्ट मत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. सोमवारला सायंकाळी अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर सचिन भेंडे यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना एका प्रश्नाचे उत्तर देताना बावनकुळेयांनी ही भूमिका स्पष्ट केली.

अमरावती महापौर निवडणुकीच्या वेळी महायुतीकडे बहुमतापेक्षा अधिक असे भाजप २५, वायएसपी १५, राष्ट्रवादी काँग्रेस ११ आणि शिंदेसेना ३ असे ५४ मते होती. त्यामुळे महायुतीचे महापौर, उपमहापौरांची निवड पक्की होती. मात्र निवडणूक सुरु झाली असता अचानक एमआयएमच्या नगरसेविका मिरा कांबळे यांनी महायुतीच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या वेळी हात वर केल्याने मोठी खळबळ उडाली.    

महायुतीच्या महापौर आणि उपमहापौरांना प्रत्येकी ५५ मते मिळाली. याबाबत पत्रकारांनी बावनकुळेयांना विचारणा केली असता ते म्हणाले की, त्यांनी पाठिंबा का दिला ? कसा दिला? याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. त्यांनी हात का वर केला, हे कळले सुद्धा नाही. आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची गरजही नव्हती. आमच्याकडे पूर्ण संख्याबळ होते. आमच्याकडील कुणी पाठिंबा मागण्यासाठी गेले नाही. त्यांच्यासोबत आमच्या पैकी कुणाची चर्चा सुद्धा

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *