नंदुरबार

दोडे गुजर समाजाकडून विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव निम्मित वह्यांचे वाटप

दोडे गुजर समाजाकडून विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव निम्मित वह्यांचे वाटप

तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- स्थानिक जिल्हा परिषद शाळा क्रमांक ८ व ९  मधील नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ‘प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून समस्त दोडे गुजर समाजाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. नवीन वर्गात प्रवेश करतानाच हातात नव्या कोऱ्या वह्या मिळाल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता.
   

        विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दोडे गुजर समाजाने हा उपक्रम राबवला आहे.

          कार्यक्रमाप्रसंगी समस्त दोडे गुजर समाजाचे अध्यक्ष बापू पाटील, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, विश्वस्त मोहन पाटील,प्रशांत पाटील, भरत पाटील, राजेंद्र चौधरी,पंकज पाटील हे उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मुकुंदा बोरसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व समाजाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.


“शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या प्रत्येक मुलाला प्रोत्साहन देणे हे समाजाचे कर्तव्य आहे. दोडे गुजर समाजाच्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच नवा उत्साह निर्माण होईल.”असे सांगितले.
            हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप पाटील, विनोद पाटील, चंद्रकांत पाटील, आणि विशेष परिश्रम घेतले व सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी दोडे गुजर समाजाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *