
शेजवा शाळेत योग दिन उत्साहात साजरा

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते.यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्यांना योग अभ्यासाविषयी व आपले शरीर निरोगी,तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा आणि प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे.म्हणून तो दररोज व नियमित करायला हवा याविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे क्रीडाशिक्षक विजय पवार यांनी केले.यात त्यांनी सांगितले की योगा व प्राणायामामुळे ताण तणाव दूर होतो. योग प्राणायाम याला पूरक म्हणून संतुलित आहार आवश्यक आहे. याविषयी सविस्तर माहिती दिली शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी योगा व प्राणायामाचे विविध आसणे करून दाखवलीत व विद्यार्थ्यांकडून करून घेतली.

यात सुरूवात म्हणून त्यांनी योगप्रार्थने पासून केली.तदनंतर सुक्ष्मव्यायाम प्रकार घेतले यात मानेचे, कमरेचे, गुडघ्याचे व्यायाम केले.त्यानंतर दंड (उभ्या) स्थितीतील आसनामध्ये ताडासन, वृक्षासन,पादहस्तासन,अर्थचक्रासन त्रिकोणासन बैठक स्थितीचे आसन यात दंडासन भद्रासन वज्रासन अर्धउष्ट्रासन,शशांकसन उत्तनमंडूकासन,वक्रासन पोटावर झोपून करावयाच्या आसनात मकरासन,भुजंगासन,शलाशासन पाठीवर झोपून करावयाचे आसन यात सेतुबंधासन,उत्तनपादासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन शवासन ह्या आसनानंतर कपालभाती प्राणायाम व ध्यानस्थिती आणि शांतीपाठ घेण्यात आला. योगाचा शेवट शपथ घेऊन करण्यात आला

यावेळी शाळेचे उपशिक्षक दिपक वळवी,रामानंद बागले, हारूणखाॅं शिकलीगर,संजय बोरसे,संदीप गायकवाड, श्रीमती संगीता गोखले कनिष्ठ लिपिक नेहा शर्मा यांनीही योगा व प्राणायामांमध्ये सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई संजय वसावे दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





