नंदुरबार

सातबारा कोरा करा; अन्यथा तीव्र आंदोलन!शेतकऱ्यांचे १००% कर्ज माफ करा -बिरसा फायटर्सची मागणी सातबारा कोरा करा; अन्यथा तीव्र आंदोलन!

शेतकऱ्यांचे १००% कर्ज माफ करा -बिरसा फायटर्सची मागणीसातबारा कोरा करा; अन्यथा तीव्र आंदोलन!

सातबारा कोरा करा; अन्यथा तीव्र आंदोलन!

नंदुरबार :- राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण १००% कर्जमाफी करा, सातबारा कोरा करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे.मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.त्या आंदोलनाला आमच्या बिरसा फायटर्स़ या सामाजिक संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे. शेकक-यांचे संपूर्ण कर्ज माफ करा,या मागणीसाठी बिरसा फायटर्स़ संघटनेकडून वारंवार निवेदने देण्यात आली आहेत.तरी सरकार आमच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.शेतकरी जगला तरच आपण सगळे जगू.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.कर्ज घेऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.कर्जबाजारीने निराश होऊन शेतकरी आत्महत्या करतात, म्हणून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा व १००% अर्ज माफ अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *