
तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो
तळोदा येथील बारगळ जागीरदारांच्या होळीला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. या राज होळीची विधिवत पूजा-अर्चा करून प्रज्वलित श्रीमंत अमरजीतराजे बारगळ व श्रीमंत धनंजयराजे बारगळ यांच्या हस्ते संपन्न झाली.

तळोद्याचे बारगळ हे मल्हारराव होळकर यांचे मामा श्रीमंत भोजराजबाबा बारगळ यांच्या घराण्याचे वंशज आहेत. बारगळ जागीरदार घराण्याला स्वतःचा समृद्ध इतिहास व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.

यावर्षी होळीची पूजा श्रीमंत अमरजीतराजे बारगळ व श्रीमंत धनंजयराजे बारगळ यांच्या हस्ते संपन्न झाली. मनीषा धनंजयराजे बारगळ तसेच देविदास शेंडे, पोलीस पाटील बापू पाटील, पंकज तांबोळी, संजय तांबोळी, होळकर, लिंबाजी गुरव, भाऊराव गुरव, गोकुळ गुरव, चुडामन गुरव व रोहित माळी तसेच बारगळ गढी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
तळोदे संस्थानची “राजहोळी” विधिवत पूजा-अर्चा करून प्रज्वलित करण्यात आली.
- 1
- 0
- 0
- 0





