नंदुरबार जि.प. स्वयं सहाय्यता गटांचे बँक लिंकेज, कर्जपुरवठा व NPA नियंत्रणासाठी जिल्हास्तरीयय आढावा बैठक संपन्न!

नंदुरबार जिल्हा परिषद स्वयं सहाय्यता गटांचे बँक लिंकेज, कर्जपुरवठा व NPA नियंत्रणासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱी, नमन गोयल(भाप्रसे) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीयय आढावा बैठक संपन्न!
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM – उमेद) अंतर्गत स्वयं सहाय्यता गटांचे (SHGs) बँक लिंकेज, वित्तीय समावेशन आणि वैयक्तिक उद्योग-व्यवसाय कर्जपुरवठ्याला गती देण्यासाठी आज (०५ ऑगस्ट २०२६) जिल्हा परिषद, नंदुरबार येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकिंग समन्वय आणि कर्जपुरवठा अधिक प्रभावी करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीतील महत्त्वाचे विषय व दिलेले निर्देश:
• पतपुरवठा व बँकिंग समन्वय: स्वयं सहाय्यता गटांना वेळेवर व पुरेसा पतपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी अधिक सकारात्मक व समन्वयाची भूमिका घेण्याचे निर्देश देण्यात आले.

• NPA नियंत्रण व उपाययोजना: थकीत कर्जांच्या (NPA) समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बँकांनी थकीत कर्ज कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.
• CBRM कमिटीची स्थापना: एनपीए वर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी बँकस्तरावर ‘सीबीआरएम (CBRM) कमिटी’ स्थापन करून नियमित बैठका आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
• प्रलंबित बँक खाती उघडणे: स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ आणि प्रभाग संघांची बँकांमध्ये प्रलंबित असलेली सर्व खाती तात्काळ उघडण्याची कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
• वैयक्तिक उद्योग कर्जपुरवठा: वैयक्तिक उद्योग-व्यवसायासाठी सादर केलेल्या सर्व कर्ज प्रस्तावांवर बँकांनी त्वरित निर्णय घेऊन पात्र लाभार्थ्यांना कर्ज वितरण पूर्ण करावे.
• प्रलंबित प्रस्ताव शून्य करणे: बँकांकडे प्रलंबित असलेल्या सर्व प्रस्तावांची संख्या वेळेच्या मर्यादेत शून्यावर आणण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीस उपस्थित अधिकारी व कर्मचारी :-
या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परमेश्वर राऊत, जिल्हा बँकांचे जिल्हा समन्वयक, उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर, जिल्हा व्यवस्थापक (आर्थिक समावेशन) उमेश अहिरराव, उमेद कक्षाचे कर्मचारी तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांचे तालुका व्यवस्थापक (आर्थिक समावेशन) उपस्थित होते.
- 0
- 0
- 0
- 0






