शेजवा विद्यालयात विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी संपन्न
नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय, शेजवा येथे विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये इयत्ता 5 वी ते 10 वी मधील एकूण 308 विद्यार्थ्यांपैकी 291 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

आरोग्य पथकाद्वारे तपासणी आणि मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश चकोर, डॉ. सोनाली कुलकर्णी, सरिता पाडवी आणि आरोग्य सेवक वसावे यांच्या वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली. तपासणी दरम्यान 23 विद्यार्थी गंभीर आजारी, तर 22विद्यार्थी किरकोळ आजारी असल्याचे आढळून आले. किरकोळ आजार असलेल्या विद्यार्थ्यांना औषधोपचार देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गंभीर आजार असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, नंदुरबार आणि ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला.प्रमुख उपस्थितीया प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेतील उपशिक्षक विजय पवार,दिपक वळवी, रामानंद बागले, हरूनखा शिकलीगर, संजय बोरसे, आनंदराव पवार, संदीप गायकवाड आणि श्रीमती संगीता गोखले श्रीमती नेहा शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिपाई संजय वसावे आणि दिनेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0






