नंदुरबार

शिक्षकांअभावी विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पहिले सत्र संपले, काही विषयांचे शून्य अध्यापन.प्रशासनाचा दुर्लक्षतेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात!

शिक्षकांअभावी विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पहिले सत्र संपले, काही विषयांचे शून्य अध्यापन.प्रशासनाचा दुर्लक्षतेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात!

तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:-

तळोदा व नंदुरबार प्रकल्पातंर्गत येणाऱ्या अनेक शासकीय आदिवासी आश्रमशाळेत वर्षानुवर्षे काही विषय शिक्षक नसल्याने विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.यासंदर्भात बिरसा आर्मीने दुसरे स्मरण निवेदन मुख्यमंत्री,आदिवासी विकासमंत्री,आयुक्त नाशिक व प्रकल्प अधिकारी तळोदा यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की,आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे,त्यांची शैक्षणिक प्रगती होऊन त्यांनी इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षणाचा समान संधी उपलब्ध व्हाव्यात.परंतु,पहिले सत्र संपले.तरीदेखील लोभाणी ता.तळोदा येथील आश्रमशाळेत इयत्ता अकरावीसाठी मराठी,इतिहास,भूगोल, रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र व अर्थशास्त्र या विषयाचे शिक्षक नाही,वडफळी ता.अक्कलकुवा येथे इ.११ व १२ साठी अर्थशास्त्र, अमोनी ता.तळोदा येथे इंग्रजी, नाला येथेही शिक्षकांची कमतरता आहे.अशा अनेक शासकीय आश्रमशाळेत विषय शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.हीच परिस्थिती नंदुरबार प्रकल्पातंर्गतही आहे.एखाद्या आश्रमशाळेची विषय शिक्षकाची मागणी आल्यास,दुसऱ्या शाळेचा शिक्षक उचलून त्या ठिकाणी दिला जातो,हा उपाय आहे का? असा प्रश्न उपस्थित करत पुन्हा दुसऱ्या शाळेची जैसे थे परिस्थिती होते.परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्क आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षकांपासून वंचित ठेवले जाते,ही अत्यंत गंभीर बाब आहे.तसेच,वर्ग -३ व ४ चे रिक्त पदे,इतर मूलभूत सुविधेसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.निवेदनावर बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी,तळोदा तालुकाध्यक्ष देविसिंग वळवी, धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी,विशाल राहसे,विशाल वळवी यांच्या सह्या आहेत.

‘वर्षानुवर्ष शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शिक्षक पदभरती,मूलभूत सुविधा,शैक्षणिक साहित्य,निकृष्ट जेवण व इतर बाबींकडे प्रशासन आदिवासी विदयार्थ्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनात येत आहे.प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे.’
राजेंद्र पाडवी,संस्थापक अध्यक्ष बिरसा आर्मी

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *