वाढते लोडशेडींग;शेतकरी हैराण बिरसा आर्मीचे कार्यकारी अभियंतांना निवेदन;आंदोलनाचा इशारा

तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
तळोदा तालुक्यातील शेतकरी वाढते लोडशेंडिंगने हैराण झाले आहे.वेळापत्रकानुसार नियमित वीज पुरवठा करावा;यासाठी बिरसा आर्मीने कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,अगोदरच शेतकरी दुष्काळाने संकटात असतांना थोडेफार आहे त्या पिकांना आवश्यक असलेला वीजपुरवठाही नियमितपणे मिळत नसून,वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेतकरी हैराण आहे.आहे त्या पिकांचेही नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.वीज पुरवठ्याचे प्रत्येक आठवड्याचे वेळापत्रक जाहीर करावे. शेती हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार असून,दुष्काळाने पिके सुकली आहे.
वीजपुरवठा विभाग लोडशेंडिंग कमी करण्याऐवजी वाढवत आहे.त्यामुळे आहे ते थोडेफार पिकांतून खर्चही निघणे कठीण आहे व सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली.आधीच वाढता शेतीखर्च, बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इतर खर्चांमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.वाढते लोडशेडिंग तातडीने बंद करून सुरळीत वीज पुरवठा सुरु ठेवावा; अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.निवेदनावर बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी, तळोदा तालुकाध्यक्ष देविसिंग वळवी,धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, विशाल वळवी यांच्या आहेत.
- 0
- 0
- 0
- 0





