नंदुरबार

नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य नितीन पाडवीची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य नितीन पाडवीची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :-                         तळोदा येथील नेमसुशिल विद्यामंदिर, तळोदा येथील विद्यार्थी आदित्य नितीन पाडवी याची 19 वर्षांखालील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्याकडून यासंदर्भात शाळेला पत्र प्राप्त झाले आहे. या निवडीमुळे आदित्यच्या क्रीडा प्रवासात महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.

आदित्य हा माजी आमदार उदेसिंगदादा पाडवी यांचा नातू आहे. क्रिकेटमधील त्याची आवड आणि पुढे जाण्याची संधी यामुळे त्याच्या कुटुंबीयांसह शाळा परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेच्या निवड प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी आदित्यची निवड करण्यात आली असून, त्याला आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

आदित्यच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखिया, संचालिका सोनाबेन तुरखिया, उपाध्यक्ष दगेसिंग महाले, सचिव संजयभाई पटेल, संस्था समन्वयक व मोती बँकेचे अध्यक्ष हर्षिलभाई तुरखिया, तसेच प्राचार्य सुनील परदेशी आणि मुख्याध्यापिका भावना डोंगरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

  • 1
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *