नंदुरबार

दोडे गुजर समाजातर्फे कै. विवेकभाई चौधरी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन

दोडे गुजर समाजातर्फे कै. विवेकभाई चौधरी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन

तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:-

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, समस्त दोडे गुजर समाजाच्या वतीने कै. विवेकभाई चौधरी यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ लोकार्पण करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन श्री. अरुणभाई चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
‘पाणी हेच जीवन’ ही उक्ती सार्थ ठरवत, समाजाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उन्हात तहानलेल्या पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण असून, ही पाणपोई एक मोठा आधार ठरणार आहे.

   याप्रसंगी दोडे गुजर समाज अध्यक्ष बापूभाई पाटील यांनी पाण्याचे महत्त्व विशद करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष  प्रकाशभाई पाटील यांच्यासह के.जी.पाटील, हिम्मतभाई पटेल,  कृष्णदास पाटील, मोहनभाई पाटील, प्रशांतभाई चौधरी, हरिषभाई पाटील, प्रमोदभाई पाटील, सोमनाथभाई पाटील, राजेंद्रभाई चौधरी, युवराज चव्हाण, भरतभाई पाटील, समाजातील अनेक मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. विवेकभाईंच्या आठवणींना उजाळा देत राबवण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन के.टी. पाटील  यांनी केले

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *