नंदुरबार

जनगणना 2027 घरगणना प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

जनगणना 2027 घरगणना प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

नंदुरबार | दि. 02 जून

जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घरगणना मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथे प्रत्यक्ष भेट देऊन घरगणना व SIR मॅपिंग कामाची पाहणी केली.

दिनांक 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत जिल्हाभरात 2,844 प्रगणकांमार्फत मोबाईल ॲपच्या सहाय्याने घरगणना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रगणक नागरिकांच्या घरी जाऊन माहिती संकलन कशा पद्धतीने करतात, याची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली.

        यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत सुरू असलेल्या SIR मॅपिंग प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला. माहिती संकलनाची अचूकता, तांत्रिक प्रक्रिया आणि नागरिकांचा सहभाग याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

  जनगणना ही देशाच्या विकास नियोजनाचा पाया असून अचूक व विश्वासार्ह माहिती संकलनासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या पाहणी दौऱ्यादरम्यान परिवीक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी श्री. पंकज पटले तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, तहसिलदार नंदुरबार प्रदिप पवार उपस्थित होते.

   डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक अचूक, पारदर्शक आणि वेगवान जनगणना प्रक्रिया राबविण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
.
.
.

जनगणना2027 #Census2027 #HouseListing #Nandurbar #DrMittaliSethi #DigitalCensus #GoodGovernance #DistrictAdministration #SIRMapping #BLO #DigitalIndia #NandurbarDistrict #PublicParticipation #DataDrivenGovernance
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *