नंदुरबार

सातपुड्याच्या कन्येची राज्यस्तरावर झेप; दिव्या पावरा हिचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

सातपुड्याच्या कन्येची राज्यस्तरावर झेप; दिव्या पावरा हिचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
नंदुरबार | दि. 02 जून
सातपुड्याच्या दुर्गम भागातील सोन या गावातील कु.दिव्या विजय पावरा हिने आपल्या मेहनत, जिद्द आणि क्रीडा कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र महिला वरिष्ठ फुटबॉल संघात निवड झाली. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते कु. दिव्या पावरा हिचा अभिनंदन व सत्कार करण्यात आला दुर्गम भागातून पुढे येत राज्यस्तरीय संघात निवड होणे ही केवळ दिव्याचीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे डॉ.मित्ताली सेठी यावेळी नमूद करण्यात आले.


  मर्यादित संसाधने आणि आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत दिव्याने केलेली ही कामगिरी ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. तिच्या यशामुळे जिल्ह्यातील अनेक युवा खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी नवी प्रेरणा मिळणार आहे.
  नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने कु.दिव्या विजय पावरा हिला आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी उत्कृष्ट यश संपादन करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
.
.
.

DivyaPawara #Football #MaharashtraWomenFootballTeam #Nandurbar #PrideOfNandurbar #WomenInSports #TribalTalent #Satpuda #DrMittaliSethi #SportsDevelopment #GirlPower #InspiringSuccess #NandurbarDistrict
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *