
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मागासवर्गीय शिक्षक संघटना व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा.

नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक भानुदास रोकडे यांच्याशी विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली प्रथमतः प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी पेसा क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना S14 वेतनश्रेणी लागू केल्याबाबत संघटनेमार्फत विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वरी इंदासराव राज्य नेते अशोक बच्छाव व नामदेव सोनवणे जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे यांच्या हस्ते संविधान प्रत देऊन त्यांचा आभार व्यक्त करण्यात आला.

नंतर TET/CTET पात्रता धारक सेवा जेष्ठ शिक्षकांना केंद्रप्रमुख, पदोन्नती मुख्याध्यापक या पदावर लवकर पदोन्नती देण्यात यावी व शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी रिक्त पदे भरण्यात यावी. शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून पटसंख्या वाढवणाऱ्या शाळांच्या जिल्हास्तरावरून प्रोत्साहन पर सत्कार करण्यात यावा म्हणजे जिल्हा परिषद शाळांच्या पट वाढण्यास मदत होईल. दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय नंदुरबार यांच्याकडून धडगाव येथे देखील कॅम्प आयोजित करण्यात यावा, शालेय पाठ्यपुस्तके हे शाळा सुरू होण्याआधीच शाळांना मिळावीत, गुणवंत शिक्षकांचा केंद्रात सत्कार करण्यात यावा, S 14 बाबत पूर्ण कार्यवाही करून मे 2026 च्या वेतनात लागू करावी, प्रलंबित वैद्यकीय बिले लवकर मंजूर करण्यात यावीत त्याचप्रमाणे माहे ऑक्टोंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या 3% महागाई भत्ता फरक माहे मे 2026 च्या पगारात मिळावा
अशा विविध विषयांवर शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळेस संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, कोषाध्यक्ष भूषण चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष विकास गांगुर्डे, जिल्हा सहसचिव मुकुंद पाटील, गोकुळ वाडीले हे उपस्थित होते.
- 1
- 0
- 0
- 0





