नाशिक साक्री
बसमधील प्रवाशाचे पैसे दागिने दिले परत…
बस वाहक चालकाचे नंदुरबार व साक्री प्रवासी महासंघातर्फे अभिनंदन
साक्री , सप्त नगरी न्यूज ब्युरो:–
शनिवार दि. एक ऑगस्ट रोजी नाशिक साक्री 8473 क्रमांकाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या पिंपळनेर येथील प्रवाशाची बॅग राहून गेली. संपर्क झाल्यामुळे पिंपळगांव आगाराचे चालक
बी. पी. मस्के आणि वाहक एम.एस. गायकवाड यांनी कर्तव्य तत्परता दाखवून सुनील चौरे (रा.पिंपळनेर) प्रवाशाची बॅग परत केली.
“या बॅगेत रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी असा एक लाखाचा ऐवज होता.”
पिंपळनेर बस स्थानकावर वाहतूक निरीक्षक इमरान सैय्यद, चालक टि.के. जाधव, वाहक एम. आर. रहेरे तसेच प्रवासी महासंघाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या उपस्थितीत बॅग सुपूर्द करण्यात आली.
वाहक चालकाच्या या प्रामाणिक कार्याचे नंदुबार व साक्री प्रवासी महासंघातर्फे महादू हिरणवाळे आणि सुरेश पारख यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
- 0
- 0
- 0
- 0





