धुळे नंदुरबार नाशिक

नंदुरबार नाशिक बस केवळ नाश्तासाठी थांबविल्याने झाला बिघाड… प्रवाशांचा मनस्ताप….

नंदुरबार नाशिक बस केवळ नाश्तासाठी थांबविल्याने झाला बिघाड…
प्रवाशांचा मनस्ताप….’­

नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो :-

शनिवार दि. एक ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेला नंदुरबार बसस्थानकावरून सुटणारी एम.एच.15 जेसी 6622 क्रमांकाची नंदुरबार – नाशिक बस सकाळी आठ वाजेच्या सुमारास सोग्रस ते वडाळीभोई दरम्यान हॉटेल मालेगावकर या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबविण्यात आली. पंधरा मिनिटांच्या विलंबानंतर बस सुरूच झाली नाही.
चालकाने प्रयत्न करूनही नंदुरबार- नाशिक बस सुरू होऊ शकली नाही. यामुळे बसमधील प्रवाशांनी तीव्र मनस्ताप व्यक्त केला. पहाटे घरून लवकर निघून कामे आटोपण्याच्या बेतात असलेल्या प्रवाशांना नंदुरबार- नाशिक नादुरुस्त बसमुळे खोळंबा झाला.


कहर म्हणजे याच हॉटेल जवळ रस्त्यावर प्रवासी आणि नादुरुस्त बसचे वाहक उभे असताना नाशिककडे जाणाऱ्या दोन ते तीन रिकाम्या बस भरधाव वेगात निघून गेल्या.
अर्ध्या तासानंतर मालेगाव नाशिक या बस मधून अनेक
प्रवाशांना पुढील प्रवास उभ्याने करावा लागला.
आनंददायी प्रवासा साठी प्रसिद्ध असलेल्या लालपरीने ऐनवेळेस प्रवाशांना मनस्ताप झाल्या बद्दल प्रवासी महासंघाकडे व्यथा मांडली.
नंदुरबार आगार प्रमुखांसह धुळे विभागीय नियंत्रकांनी प्रवाशांच्या सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *