
तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो
येथील शेठ.के.डी हायस्कूल ची दोन दिवशीय शैक्षणिक सहल संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी व शाळेचे मुख्याध्यापक जे एल सूर्यवंशी यांच्या परवानगीने सहलीचे नियोजन करण्यात आले होते व ही सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सहलीत प्रमुख मार्गदर्शक पी पी पाटील, सहप्रमुख पी एम वानखेडे, सदस्य श्रीमती एस के माळी, श्रीमती ज्योती देवरे, व आरोग्य अधिकारी म्हणून एस एस ठाकरे यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार किट डॉ.दीपक देवरे यांनी निःशुल्क उपलब्ध करून दिले होते.
सहलीत विद्यार्थ्यांनी आपला गौरवशाली इतिहास,प्राचीन वास्तू त्यांची जतन व संरक्षण करण्याची भावना,परिसराच्या भूगोलामुळे निर्माण झालेला इतिहास, आपली श्रद्धा स्थाने व तेथील आदर्श व्यवस्था आदींची शिदोरी घेत विद्यार्थी अनुभव संपन्न झालेत.
शेठ के डी हायस्कूल तर्फे विद्यार्थ्यांना दि. 10 व 11 जानेवारी या दोन दिवसीय सहलीत कालीमठ, घृष्णेश्वर मंदिर, देवगिरी किल्ला, भद्रा मारुती, छत्रपती संभाजी नगर, बीबी का मकबरा, पाणचक्की, जायकवाडी प्रकल्प, वस्तू संग्रहालय, देवगड येथील दत्तप्रभूंचे मंदिर,वेरूळ येथील जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या लेणी त्यात एकाच अखंड दगडात कोरलेली कैलास लेणी,त्यातील चित्ररूपातील कथा, भद्रा मारुती,दौलताबादचा देवगिरी किल्ला त्यांचा अंधेरी मार्गासह त्याची अजिंक्य अशी संरक्षण व्यवस्था,याच्या अभ्यास व अनुभव घेतला.आपली धार्मिक आस्था असलेले शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर व तेथील भोजन प्रसादालय व व्यवस्था याचा अनुभव घेतला. सहल शासनाचे नियम पालन करीत एस टी बस ने गेली होती.शाळेतील 37 विद्यार्थ्यांसोबत सहल यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक जे एन माळी, अक्कलकुवा डेपो चे आगार प्रमुख राजेंद्र मोरे, एस टी बस चे चालक के एन बोरकर, क्रीडा प्रमुख एम एम सागर, परीक्षा समिती सदस्य एन डी मोरे, एन सी सी ऑफिसर पी बी राजपूत, ज्येष्ठ शिक्षक एस एन मगरे, कला शिक्षक आर आय चव्हाण, सी के इंगळे, व्ही.व्ही पगार,आर एन कोकणी, जागृत मगरे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
- 0
- 0
- 0
- 0





