
रोझवा पुनर्वसन येथे होळी महोत्सवानिमित्त ढोल,बावा, बुद्या स्पर्धेचे आयोजन
तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील जुनाना, बादल ह्या गावांचा सांस्कृतिक परंपरेने चालत आलेला होळी महोत्सव दिनांक 2 मार्च सोमवार रोजी साजरा होणार असून रात्री ढोल, बाबा बुद्या नृत्य स्पर्धा होणार आहेत. या सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रमाचा परिसरातील सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोझवा पुनर्वसन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
ढोल स्पर्धेसाठी पहिले बक्षीस गावकरी रोझवा पुनर्वसनतर्फे 7551,दुसरे बक्षीस सुभाष पावरा यांच्यातर्फे 5051, तिसरे बक्षीस गणपत पावरा यांच्यातर्फे 3051 तर बाबा बुद्या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस विजय पावरा यांच्यातर्फे 7051, दुसरे बक्षीस कै. नमा पावरा यांच्या स्मरणार्थ कैलास पावरा यांच्यातर्फे 5051, तिसरे बक्षीस प्रताप पावरा यांच्यातर्फे 3051 तसेच खुर्ची ढोल साठी पहिले बक्षीस 2151 दुसरे बक्षीस 1551, तिसरे बक्षीस 1151 असे ठेवण्यात आले आहे. होळी गीत गायनासाठी सर्वांना समान बक्षीस दिले जाणार आहे
स्पर्धेसाठी ढोल मालकांनी रात्री आठ ते 11 यादरम्यान नाव नोंदणी करणे आवश्यक असून 11 वाजेनंतर नाव नोंदणी केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले असून होळी महोत्सवात दारू तसेच जुगार बंद राहील. तसेच कुठे आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल असे समस्त गावकरी रोझवा पुनर्वसन यांच्यातर्फे सांगण्यात आले आहे.
- 1
- 1
- 0
- 0





