
पर्यावरण संवर्धनात तळोदा नॅशनल हायस्कूलचा शिक्षक शब्बीर मन्सुरी गौरव
तळोदा (जि. नंदुरबार) |सप्त नगरी न्यूज ब्युरो
राष्ट्रीय हरित सेना व इको क्लब अंतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमधील उल्लेखनीय कार्याची दखल घेत नॅशनल हायस्कूल तळोदा येथील शिक्षक शब्बीर मन्सुरी यांचा प्रशंसापत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
हे प्रशंसापत्र व सन्मानचिन्ह माननीय गजेंद्र हिरे, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग, नाशिक तसेच माननीय डॉ. एस. पी. गुजर, वनविभाग अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या गौरव सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडामंत्री तथा माजी आमदार पद्माकर वळवी व वनश्री पुरस्कार प्राप्त व्ही सी मगरे, विकास शिंदे, श्रीमती एल के आहिरे, प्रियंका मोरे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
शब्बीर मन्सुरी उपशिक्षक नॅशनल हायस्कूल हायस्कूल तळोदा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमार्फत वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर अभियान, पर्यावरण जनजागृती रॅली, स्वच्छता अभियान, जलसंवर्धन तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीविषयक विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम व पर्यावरणाबाबत जबाबदारीची भावना वाढीस लागली आहे.
या सन्मानामुळे शाळेच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. शाळेच्या या यशाबद्दल शेख इकबाल, निलेश सूर्यवंशी, नितीन शिंपी, नरेंद्र माळी, एजाज कुरेशी, जुबेर अन्सारी, नाजनीन पठाण, इरफान शेख, खालिद सय्यद, इम्रान सय्यद, मोहसीन शेख, रुकय्या खान, वसिम खाटीक, तौसिफ मन्यार, जुबेर लष्करी, हमीद शेख व फिरोज पिंजारी यांनी अभिनंदन केले.

- 0
- 0
- 0
- 0





