नंदुरबार

कोठार आश्रम शाळेत गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त ‘हिंदी की चादर’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

कोठार आश्रम शाळेत गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त ‘हिंदी की चादर’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो

गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार ‘हिंदी की चादर’ हा उपक्रम कोठार येथील आश्रम शाळेत उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित आपली कला व विचार सादर केले.


                        रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी गुरु तेगबहादूर यांच्या जीवनकार्य, त्याग, मानवता, धार्मिक सहिष्णुता व राष्ट्रप्रेम या मूल्यांवर आधारित आकर्षक रांगोळ्या साकारल्या. निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गुरु तेगबहादूर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, समाजासाठी केलेले बलिदान तसेच त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता यावर प्रभावी लेखन केले. वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपले विचार मांडत श्रोत्यांची दाद मिळवली.

                    या सर्व स्पर्धांचे आयोजन प्राथमिक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील व माध्यमिक मुख्याध्यापक जयवंत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार आश्रम शाळांमध्ये गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त ‘हिंदी की चादर’ उपक्रम राबवून विविध विषयांवरील स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, नैतिक मूल्ये व भाषिक कौशल्यांचा विकास घडवून आणण्याचा उद्देश साध्य करण्यात आला.

                   कार्यक्रमावेळी निंबा रावडे, जयेश कोळी, महेश वायकर, चेतन अहिरराव, हंसराज महाले,नीता गुरव आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *