नंदुरबार

धडगाव येथे बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन संपन्नबालकांचे पोषण, माता-बाल आरोग्य आणि अंगणवाडी सेवांना मिळणार नवे बळ

धडगाव येथे बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
बालकांचे पोषण, माता-बाल आरोग्य आणि अंगणवाडी सेवांना मिळणार नवे बळ

धडगाव | दि. 12 मे
धडगाव येथे आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघाचे मा. आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या हस्ते बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या नव्या कार्यालयामुळे दुर्गम व आदिवासी भागातील माता-बाल आरोग्य, पोषण आणि अंगणवाडी सेवांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळणार आहे.

उद्घाटन समारंभ प्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी हाके साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी संगीता नाईक मॅडम तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     बालकांचे आरोग्य आणि पोषणाला प्राधान्य
या कार्यालयाच्या माध्यमातून बालकांचे पोषण, गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य, अंगणवाडी सेवा तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात प्रशासनामध्ये संवेदनशीलता, शिस्त आणि लोकहिताची जाणीव अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

   आदर्श सेवा केंद्र उभारण्याचा विश्वास
धडगाव, खुंटामोडी आणि तोरणमाळ प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांना या कार्यालयामुळे नवे बळ मिळणार असून, हे केंद्र नागरिकांसाठी आदर्श सेवा केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले.
.
.
.

धडगाव #बालविकासप्रकल्प #डॉमित्तालीसेठी #आमश्यादादापाडवी #महिलावबालविकास #अंगणवाडी #माताबालआरोग्य #पोषणअभियान #नंदुरबार #TribalDevelopment #ChildDevelopment #Nandurbar #Dhadgaon #ICDS #WomenAndChildDevelopment
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *