नंदुरबार

महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोद्यात महसूल आढावा बैठक संपन्न

महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोद्यात महसूल आढावा बैठक संपन्न

  नंदुरबार | दि. 11 मे 2026
  महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न

नंदुरबार जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीदरम्यान महसूल विभागातील विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढून नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

   EQJ Court प्रणालीच्या प्रभावी वापरावर भर
न्यायालयीन कामकाज अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी EQJ Court प्रणालीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच SSP संदर्भातील पत्रव्यवहारावर विशेष लक्ष ठेवून सर्व प्रकरणांची वेळेत पूर्तता करण्यास सांगण्यात आले.

  नोंदवह्या अद्ययावत ठेवण्याच्या सूचना
कार्यविवरण नोंदवह्या तसेच जन्म-मृत्यू नोंदवह्या नियमितपणे अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रशासनातील माहिती अचूक व अद्ययावत राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

  जुलै पर्यंत पेपरलेस कार्यालयाचे लक्ष्य
डिजिटल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्ह्यातील महसूल कार्यालये जुलै पर्यंत पेपरलेस करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. यासाठी ई-ऑफिस प्रणाली, डिजिटल फाइल व्यवस्थापन आणि ऑनलाइन कार्यपद्धती प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तहसील कार्यालय व शासकीय इमारतींची पाहणी
बैठकीनंतर मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी तळोदा येथील तहसील कार्यालय तसेच विविध शासकीय इमारतींमधील कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी केली. कार्यालयीन कामकाज, स्वच्छता, दस्तऐवज व्यवस्थापन आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेत आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

नागरिकाभिमुख प्रशासनासाठी तत्काळ कार्यवाही
महसूल विषयक विविध कामांमध्ये गती आणून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
.
.
.

नंदुरबार #तळोदा #डॉमित्तालीसेठी #महसूलआढावा #RevenueDepartment #PaperlessOffice #DigitalAdministration #EQJCourt #GoodGovernance #CitizenServices #Nandurbar #Taloda #Maharashtra
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *