नंदुरबार

वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे १,५०० हून अधिक सीड बॉल तयार

वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे १,५०० हून अधिक सीड बॉल तयार 

← Back

Thank you for your response. ✨

शहादा | सप्त नगरी न्यूज ब्युरो :-
वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शहादा येथील स्काऊट विभागातर्फे पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी सीड बॉल निर्मिती हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. सध्याच्या काळात वाढते वार्षिक तापमान, विकास कामांसाठी होणारी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड आणि त्यामुळे निर्माण होत असलेले पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेऊन स्काऊट शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून १,५०० हून अधिक सीड बॉल तयार केले.


या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी कडुलिंब, चिंच, बोर, जांभूळ व गुलमोहर या वृक्षांच्या बिया तसेच नदीपात्रातील माती संकलित करून योग्य पद्धतीने सीड बॉल तयार केले. या कार्यासाठी व्ही. एस. पावरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. एम. पाटील, उपमुख्याध्यापक एस. आर. बोरसे, पर्यवेक्षक ए. डी. खेडकर तसेच ए. ए. खान यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सीड बॉलचे निरीक्षण करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या उपक्रमामुळे परिसरातील वृक्षसंख्येत निश्चितच वाढ होऊन पर्यावरण संवर्धनास मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्काऊट शिक्षक व्ही. एस. पावरा यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या सीड बॉल निर्मितीच्या प्रात्यक्षिक कार्याचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्काऊट शिक्षक ए. एच. तेलगोटे, एन. एल. शेवाळे, पी. एम. जाधव, एस. के. मुंजाळ व आर. डी. कापसे यांनी मोलाचे सहकार्य केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *