Uncategorized

काँग्रेस कमिटीच्या शहर व तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

काँग्रेस कमिटीच्या शहर व तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर 

धडगाव- वालसिंग वळवी, तळोदा- राहुल पावरा, अक्कलकुवा शिवराम वळवी, नंदुरबार- विजय राजपूत, नवापूर- जालमसिंग गावीत, शहादा- मदन पावरा, मोलगी विभाग- सोन्या वसावे.

नंदुरबार | सप्त नगरी न्यूज: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून राज्यातील विविध तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात. प्रदेश काँग्रेस कमिटीने एका पत्रकान्वये निवड जाहीर केली आहे.

संघटन सृजन अभियाना अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी जिल्ह्यांमध्ये भेटी देऊन जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ब्लॉक अध्यक्ष नियुक्ती संदर्भात प्रदेश कार्यालयाकडे दिलेल्या शिफारशी विचारात घेता तसेच काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून राज्यातील तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.


सांगली जिल्हा ग्रामीण भागात शिराळा तालुकाध्यक्ष पदी रवी भगवानराव पाटील, ईश्वरपूर तालुका अध्यक्ष पदी विजय अशोकराव महाडीक, कवठे महंकाळ तालुका अध्यक्ष पदी अविराज पांडुरंग शिंदे, आटपाडी तालुका अध्यक्ष पदी राहुल रामचंद्र गायकवाड, खानापूर तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत सुदाम चव्हाण, विटा तालुका अध्यक्ष पदी
सुर्यकांत बाबुराव पाटील, जत
तालुका अध्यक्ष पदी महादेव पाटील यांची निवड करण्यात आली.

कोल्हापूर शहर ब्लॉक नं. १ अध्यक्ष पदी संजय पटकारे, ब्लॉक नं. २ अध्यक्ष पदी राजदीप भोसले, ब्लॉक नं. ३ अध्यक्ष पदी धनंजय सावंत, ब्लॉक नं. ४ अध्यक्ष पदी
संदीप सरनाईक, ब्लॉक नं. ५ अध्यक्ष पदी भैय्या शेळके, ब्लॉक नं. ६ अध्यक्ष पदी नंदकुमार पिसे यांची निवड करण्यात आली.

बदनापूर शहर अध्यक्ष पदी जावेद बागवान, अंबड शहर अध्यक्ष पदी जाकेर डावगावकर शेख, जाफ्राबाद शहर अध्यक्ष पदी मेहबूब शेख टेलर, भोकरदन शहर अध्यक्ष पदी शेख सत्तार,

यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुकाध्यक्ष पदी शंकर तोळाराम जाधव दारव्हा अध्यक्ष पदी
गणेश वामनराव बीदेकर, महागाव ग्रामीण अध्यक्ष पदी सुनिल बाबुसिंग राठोड, महागाव शहर अध्यक्ष पदी शैलेश दिलीप सुरोशे (कोपरकर),

वाशिम जिल्ह्यात वाशिम तालुकाध्यक्ष पदी गजानन बाबाराव गोटे, कारंजा तालुकाध्यक्ष पदी विजय प्रल्हादराव देशमुख, कारंजा शहर अध्यक्ष पदी अब्दुल राजीक अब्दुल अजिम, वाशिम शहर अध्यक्ष पदी सागर प्रल्हादराव गोरे, रिसोड तालुकाध्यक्ष पदी रामेश्वर गणपत देवकर, मंगरुळपीर अध्यक्ष पदी दिलीप शेरुभाई मोहनावाले, मालेगाव तालुकाध्यक्ष पदी संदीप किसनराव घुगे, मनोरा अध्यक्षपदी रामनाथ प्रल्हाद राठोड, यांची निवड झाली.

नंदुरबार जिल्ह्यात

धडगाव अक्राणी तालुकाध्यक्ष पदी
वालसिंग रंगल्या वळवी, तळोदा तालुकाध्यक्ष राहुल पावरा, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष पदी शिवराम शंकर वळवी, नंदुरबार तालुकाध्यक्ष पदी विजय भिमसिंग राजपूत, नवापूर तालुकाध्यक्ष पदी जालमसिंग कातुड्या गावीत, शहादा तालुकाध्यक्ष पदी मदन मिठ्या पावरा, अक्कलकुवा – २ मोगली विभाग अध्यक्ष पदी सोन्या टेंबऱ्या वसावे यांची निवड करण्यात आली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *