पुस्तकातून विद्यार्थी यश, नेमसुशील समुहाच्या कार्याचे प्रतिबिंब उमटले मान्यवरांचे प्रतिपादन

नेमसुशिल शैक्षणिक समूहात पुस्तक प्रकाशन सोहळा

तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा नुकताच पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, संस्थाध्यक्ष निखीलभाई तुरखीया, मातोश्री मनोरमा मगरे, इंजि. वतनकुमार मगरे, संचालिका सोनाभाभी तुरखीया, उपाध्यक्ष डी एम महाले, सचिव संजयभाई पटेल, समनव्यक हर्षिलभाई तुरखीया, दिपकभाई बाविसी, सौ भावनाबेन बाविसी, समवेत तळोदा नगर परिषद नगरसेविका अनिता परदेशी, जयश्री महाले, मोनिका माळी, कपिल कर्णकार, नदिम बागवान, अनुपकुमार उदासी, हितेंद्र क्षत्रिय, संदिप परदेशी, जितेंद्र दुबे आदी मान्यवर मोती बँक जनरल मॅनेजर गणेश पाटील, मॅनेजर वसंत पाटील, मॅनेजर नितीन वाणी, मॅनेजर किरण पटेल, यांची उपस्थिती होती.
यावेळी मातोश्री मनोरमा वामनराव मगरे शैक्षणिक संकुल व रोबोटीक AI लॅब चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
प्रसंगी विद्यामंदिरातील विद्यार्थिनीनी शिवस्तुती गायन करून उपस्थितांची मने जिंकली त्यांना संगीतबद्ध संगीत शिक्षिका सौ कल्याणी वडाळकर, सचिन पाटील, मयूर मराठे यांनी केले.

सदरील शालेय पुस्तकात विद्यार्थी शिक्षक व पालकांच्या विविध कलागुणांना वाव देण्यात आला आहे.
प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या मनोगतातून नेमसुशिल संस्था संस्कारक्षम व शिस्तीच्या बाबतीत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले आमदार राजेश पाडवी यांनी देखील नेमसुशिल विद्यामंदिराबद्दल व विद्यार्थ्याबद्दल स्तुती करत सामाजिक धार्मिक व शैक्षणिक शिस्त बद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले प्रसंगी मोती बँकेच्या अध्यक्षपदी संस्थेचे समनव्यक हर्षिलभाई तुरखीया यांची निवड करण्यात आली. व मान्यवरांच्या हस्ते पदभार सोपविण्यात आला. डिजिटल मतदानातून हेड बॉय हिमांशू मुकेश सोनवणे तर हेड गर्ल पूर्वा जितेंद्र चौधरी इयत्ता 10 यांची निवड करण्यात आली.

नेमसुशिल पुस्तिका ही भावेशभाई अजमेरा यांच्या यांच्या संकल्पेतून साकारण्यात आली असून हर्षिलभाई भाई यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी प्रिन्सिपल पी डी शिंपी मुख्या.श्रीमती भावना डोंगरे मुख्या.गणेश बेलेकर उपप्राचार्या कल्याणी वडाळकर मुख्या.अर्चना पाडवी मुख्या.मनिषा पाटील विद्यामंदिरातील शिक्षक शिक्षिका पालक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कुवर व रेखा मोरे यांनी केले तर आभार विद्यार्थिनी दिक्षा महेंद्र सूर्यवंशी ह्या विद्यार्थिनीने मानले.
- 1
- 1
- 0
- 0






