शिर्डी येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार तळोद्यातील श्यामसिंह राजपूत यांना प्रदान

नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
बी. दि चेंज फाउंडेशन कोपरगांव च्यावतीने राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य, समाजाच्या सर्वागीण विकासासाठी मोलाचे योगदानाबद्दल श्यामसिंह हिम्मतसिंह राजपूत यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार – 2026 या राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानाने गौरविण्यात आले. राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अहिल्यानगर, जिल्हातील शिर्डी येथे बी. दि चेंज फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६ या दिमाखदार सन्मान सोहळा पार पडला. सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या सोहळ्यास सुभेदार मेजर सुनील मोहोड, त्रिदल सैनिक संघ नाशिक व सैनिक फेडरेशन नाशिक चे कार्याध्यक्ष अरुण भंडारे, मॉडेल व अभिनेत्री निवेदिता पगार, पंजाब नेशनल बँक मॅनेजर निलेश घोडेचोर, प्रोपशनल मेकअप आर्टिस्ट शुभांगी थोरात, डॉ. निलेश गायकवाड, ॲड योगेश दवंगे, आदी मान्यवरांचा हस्ते सन्मान करण्यात आला.

असाच शासन, प्रशासन, खाजगी क्षेत्र तसेच सामाजिक कार्य क्षेत्रामध्ये निष्ठा, प्रामाणिकपणा, कार्यतत्परता व समाजहिताची जाणीव ठेवून उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य केले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या आपल्या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६ हा राज्यस्तरीय सन्मान तळोद्यातील श्यामसिंह हिम्मतसिंह राजपुत यांना प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल श्यामसिंह राजपूत यांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी व पुढील यशस्वी हेवाटचालीसाठी शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- 0
- 0
- 0
- 0





